Wednesday, 17 May 2017

कौशल्यपूर्ण कामगारांची गरज सर्वच क्षेत्रात असल्याने
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना मागणी
...............................................................
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तात्रेय फडतरे
...............................................................
फडतरे नॉलेज संचलित आय.टी.आय. विभागातील
11 विद्यार्थ्यांची मर्चंट नेव्हीत निवड
...............................................................


औद्योगिक क्षेत्रात कुशल कामगारांची वाणवा असल्याने ओद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून अकुशल कामगारांना प्रशिक्षण देऊन कुशल कामगार घडविण्याचे काम प्रामुख्याने केले तर ओद्योगिक क्षेत्रातील कुशल कामगारांची वाणवा कमी होण्यास मदत होईल असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तात्रेय फडतरे यांनी व्यक्त केले.
कळंब (ता.इंदापुर)येथील फडतरे नाँलेज सिटीच्या आयटीआय विभागातील ११ विद्यार्थ्यांची मर्चंट नेव्ही या कंपनीत निवड झाल्याने त्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात फडतरे बोलत होते.यावेळी जय फडतरे,प्राचार्य अनिल तांबे,अतुल बोंद्रे,के.बी.गवळी,आस्मा मुलाणी,मोनिका आखाडे आदी उपस्थीत होते.या मर्चंट नेव्ही कंपनीसाठी विद्यार्थ्यांची लेखी परिक्षा,मुलाखत व मेडीकल आदी प्रोसेस पुर्ण करून ११ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली आहे.निवड झालेल्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा झाल्यावर हे विद्यार्थी मर्चंट नेव्ही च्या ट्रेनिंग साठी  हैद्राबाद येथे जाणार असून ट्रेनिंग पुर्ण झाल्यावर पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांना 200 ते300डाँलर म्हणजे भारतीय चलनात बारा हजार ते एकोणीस हजारा पर्यत तर दुर-या वर्षी 1100 ते 1400 डाँलर म्हणजे सत्तर ते नव्वद हजारांपर्यत पगार मिळणार असल्याचे प्राचार्य अनिल तांबे सांगितले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष उत्तम फडतरे यांनी अभिनंदन केले.





No comments:

Post a Comment