Saturday, 26 August 2017

जंक्शन-वालचंदनगर मॅरेथॉनसाठी
नावनोंदणी प्रचंड उत्साहात प्रतिसाद
नावनोंदणी करण्यासाठी ता. 28 पर्यंतची मुदतवाढ

कळंब-वालचंदनगर येथील फडतरे ग्रुपच्या फडतरे स्पोर्टस फौंडेशनतर्फे येत्या 29 ऑगस्ट 2017 रोजी म्हणजे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिवशी राष्ट्रीय क्रिडादिनाच्या निमित्ताने जंक्शन ते वालचंदनगर अशी आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे.
या स्पर्धेसाठी प्रचंड उत्साहात नावनोंदणी सुरु झाली आहे. स्पर्धेसाठी आतापर्यंत 250 स्पर्धकांनी नोंदणी केली असून गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सलग सुट्ट्यांमुळे आगाऊ नोंदणी करण्याची मुदत आम्ही 28 तारखेपर्यंत वाढवित आहोत असे स्पर्धेच्या नियोजनाचे काम करणारे प्राचार्य संदीप पानसरे यांनी सांगितले आहे.
प्रत्येक स्पर्धकास टी-शर्ट, कॅप व सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार असून स्पर्धा नोंदणी फी रु. 50 राहणार आहे.
इयत्ता  6 वी ते 10 वीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा दोन गटात होईल. 14 वर्षाखालील मुलांसाठी 3 किलोमीटर व मुलींसाठी 2 किलोमीटर अंतराची ही मॅरेथॉन असेल तर 17 वर्षाखालील मुलांसाठी 5 किलोमीटर व मुलींसाठी 3 किलोमीटर अंतराची ही स्पर्धा घेतली जाणार आहे.
स्पर्धतील विजेत्यास प्रथम क्रमांकास रु. 5001 व ट्रॉफी, व्दितीय क्रमांक 3001 व ट्रॉफी, तृतीय क्रमांक 2001 व ट्रॉफी अशी बक्षिसे असणार आहेत.  दोन्ही गटांसाठी स्वतंत्र बक्षीसे असणार आहेत.
कळंब-वालचंदनगर परिसरातील अत्याधुनिक शैक्षणिक संकुल फडतरे नॉलेज सिटी हे या स्पर्धेचे आयोजक आहेत. स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी श्री. पठाण सर 9922047866, श्री. सोरटे सर 9421950571 यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेच्या नियोजनाचे काम प्राचार्य संदीप पानसरे करत असून जास्तीत जास्त विद्यार्थी व शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

चला जीएसटी जाणून घेऊया!

बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निकतर्फे
जीएसटी विषयी परिसंवादाचे आयोजन उत्साहात


कळंब परिसरातील उद्योजक
, व्यापारी व विद्यार्थी यांच्यासाठी जीएसटी या विषयावरील परिसंवादाचे आयोजन फडतरे नॉलेज सिटी अंतर्गत बाबासाहेब पॉलिटेक्निकमध्ये नुकतेच करण्यात आले होते.

1 जुलै 2017 पासून संपूर्ण देशात एकच करप्रणाली लागू करण्याच्या उद्देशाने केंद्रसरकारने जीएसटी करप्रणाली लागू केली आहे. या कार्यप्रणालीविषयी शासकीय स्तरावरून सर्वांना समजेल अशी माहिती देण्याचे काम सुरु आहेच. पण अनेक व्यापारी, उद्योजकांना आपल्या काही शंका मात्र दूर करता येत नव्हत्या. त्यांच्या धंद्याविषयी उद्योगाविषयी, कच्च्या मालाविषयीचे अनेक प्रश्न होते. तसेच विद्यार्थ्यांमध्येही या कायद्याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती.

यासाठी बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निकने पुढाकार घेत सर्वांसाठी जीएसटी परिसंवाद घेण्याचे नियोजन प्राचार्य के.बी. गवळी यांनी केले. ज्येष्ठ आर्थिक सल्लागार सुधाकर कुलकर्णी व बँकर दिलीप बोरकर यांनी या परिसंवादात सहभागी झालेल्यांना मार्गदर्शन तर केलेच शिवाय त्यांच्या शंकांचे समाधानही केले.

फडतरे नॉलेज सिटीतर्फे बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निकने या अशा उपक्रमाचे आयोजन केल्यामुळे सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली व प्राचार्य गवळी यांचे आभार मानले.




Sunday, 13 August 2017

बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निक - ग्रंथपाल दिवस

बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निकमध्ये 
साजरा झाला ग्रंथपाल दिवस 


कळंब-वालचंदनगर येथील फडतरे नाॅलेज सिटी अंतर्गत बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निकलमध्ये भारतीय ग्रंथपालन व्यवसायाचे जनक डाॅ. शियाली रामामृत रंगनाथ यांच्या 125 व्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. 12 आॅगस्ट 1892 हा श्री. रंगनाथ यांचा जन्मदिन हा ग्रंथपाल दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. गणिताचे प्राध्यापक असलेले रंगनाथन 1924 साली मद्रास विद्यापीठाचे ग्रंथपाल झाले आणि भारतीय ग्रंथपालनाचा उगम झाला.
यानिमित्ताने पॉलिटेक्निकमधील सुसज्ज ग्रंथालयात श्री. रंगनाथ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी वर्ग व पॉलिटेक्निकच्या ग्रंथपाल सौ. जाधव, व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडियम स्कूलच्या ग्रंथपाल मिस शिंदे, एम.बी.ए. कॉलेजचे श्री. पवार सर, एम.बी.ए.चे प्रमुख श्री. बडवे सर, प्रिन्सिपल के.बी. गवळी उपस्थित होते.
यावेळी श्री. रंगनाथ यांनी सांगितलेल्या ग्रंथपालन शास्त्राची माहिती जाधव मॅडम यांनी दिली. त्या म्हणाल्या, रंगनाथ यांनी ग्रंथपालन शास्त्राची पाच सूत्रे सांगितली आहेत 1. ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत 2. प्रत्येक वाचकाला त्यांचा ग्रंथ मिळाला पाहिजे. 3. प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे. 4. वाचकाला वेळ वाचला पाहिजे. 5. ग्रंथालय वर्धिष्णु संस्था आहे.





Wednesday, 9 August 2017

9 AUG 2017 क्रांतीदिन समारंभ

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला फडतरे पॉलिटेक्निकमध्ये महत्व

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला
फडतरे पॉलिटेक्निकमध्ये महत्व

प्राचार्य के.बी. गवळी यांचे प्रतिपादन

कळंब-वालचंदनगर येथील फडतरे नॉलेज सिटी अंतर्गत बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निकमध्ये निर्भया पथकातील महिला पोलिसांनी तक्रारपेटी बसविली आहे. त्यामध्ये तक्रारी टाकण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.  महाविद्यालयांमध्ये अचानक भेट देवून मुलींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओंवर कारवाई करण्याचे काम निर्भया पथकातील पोलिस करत असतात.
.......................................................................
निर्भया पथकातर्फे तक्रारपेटीचे अनावरण
.......................................................................
याप्रसंगी प्राचार्य के.बी. गवळी म्हणाले, मुलींच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी ही पेटी कॅम्पसमध्ये बसविली आहे, फडतरे पॉलिटेक्निक नेहमीच विद्यार्थीनींना सुरक्षित शैक्षणिक कॅम्पस भर देत आला आहे. या तक्रार पेटीच्या माध्यमातून तक्रार निर्भयपणे पोलिसांकडे करता येणार आहे. आठवड्यातून एकदा ही पेटी उघडण्यात येणार आहे.
यावेळी महिला पोलिस अमृता भोईटे, अंजली नागरगोजे व वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या माधुरी लडकत, धनश्री जमदाडे, नीलम बनसोडे, अमित दुरुगकर, काशिनाथ मलगुंडे उपस्थित होते.



फडतरे पॉलिटेक्निकच्या विद्यार्थीनींनी राख्या बांधल्या पोलिस कर्मचाऱ्यांना.....!!

बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निकच्या विद्यार्थीनींनी
बांधली राखी पोलिस कर्मचाऱ्यांना!!!
कळंब-वालचंदनगर येथील बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निक मधील विद्यार्थीनीनी वालचंदनगर येथील पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. फडतरे उद्योग समूहाच्या अंतर्गत फडतरे नॉलेज सिटी हा परिसरातील सर्वात आधुनिक कॅम्पस आहे. विद्यार्थी-विद्यार्थींना नर्सरी ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतची शिक्षणाची सोय येथे उत्तम दर्जाची उपलब्ध आहे.
राखी पौर्णिमेच्या या कार्यक्रमास अध्यक्ष उत्तम फडतरे, सचिव दत्तात्रय फडतले, प्राचार्य के.बी. गवळी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलिस हवालदार दिलीप शिंदे, सुरेक्ष राक्षे, सुरेंद् वाघ, ज्ञानेश्वर जाधव, महिला पोलिस माधुरी लडकत, मोनिका गायकवाड, रिद्धी ठाकर उपस्थित होत्या.



वृक्षसंवर्धनाचा सामाजिक संदेश

कळंब येथे विद्यार्थीनींनी झाडांना राख्या बांधून
वृक्षसंवर्धनाचा दिला सामाजिक संदेश

कळंब-वालचंदनगर येथील फडतरे नॉलेज सिटी अंतर्गत व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थीनींनी झाडांना राख्या बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे व सचिव दतात्रय फडतरे यांच्या मार्ग दर्शनाखाली रक्षाबंधनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन येथे करण्यात आले होते.
कळंब येथे व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडियम स्कूलमधील विद्यार्थीनींनी शाळेमध्ये राख्या तयार केल्या व त्या शाळेच्या आवारातील झाडाला बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. यावेळी प्राचार्य संदीप पानसरे म्हणाले, झाडे ही मनुष्याला मोफत ऑक्सिजन, फळे, फुले, सावली देत असतात. प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी झाड लावून वृक्षसंवर्धन मोहिमेत सहभाग घ्यावा, यावेळी कलावंत भिसे, राजेंद्र जाधव, अर्चना रणवरे, अश्विनी रणवरे, चारुशीला जाधव, तृप्ती पालसे, मोनिका गायकवाड उपस्थित होत्या.

Monday, 7 August 2017

बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निकमध्ये
फ्रेंडशिप डे झाला उत्साहात साजरा
कळंब-वालचंदनगर येथील फडतरे नॉलेज सिटी अंतर्गत बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निकमध्ये युवकांचा आवडता फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कॉलेजच्या प्रवेशद्वारावर मोठ्या दोरखंडास विद्यार्थ्यांनी फ्रेंडशिप बँण्ड कॉलेजला बांधले. यातून विद्यार्थी व कॉलेज हे नातं नव्या पद्धतीने रुजतयं असा प्रत्यय आता येऊ लागलाय.
विद्यार्थ्याचं अभ्यासाचं टेन्शन हलकं करण्यासाठी अशा प्रकारचे अनेक उपक्रम राबविण्याचे धोरण कॉलेज प्रशासनाने स्वीकारले आहे त्याचाच एक भाग म्हणून आज फ्रेंडशिप बॅण्ड बांधण्याचा उपक्रम घेण्यात आला. रंगीबेरंगी बॅण्डमुळे विद्यार्थ्यांच्या हातांबरोबरच कॉलेजमध्ये बांधलेला दोरखंडही रंगीबेरंगी झाला होता.













Sunday, 30 July 2017

नागपंचमी सणानिमित्त प्राचार्यांचा अनोखा उपक्रम

#PKC#POLY#2017#
फडतरे नॉलेज सिटीच्या पॉलिटेक्निकमध्ये
विद्यार्थ्यांनी घेतला पतंग उडवण्याचा आनंद

नागपंचमी सणानिमित्त प्राचार्यांचा अनोखा उपक्रम

 

नागपंचमी सणानिमित्त सुट्टीच्या मूडमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना एक अनोखी ट्रीट आज फडतरे पॉलिटेक्निकच्या प्राचार्यांनी दिली. नागपंचमीचा सणामुळे विद्यार्थीनी आज पारंपारिक नागपचंमीचा सण साजरा करण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी नाच-गाण्याचा सूर ताल धरला होता. यावेळी विद्यार्थ्यांनाही याचा वेगळा अनुभव देण्यासाठी पतंग उडवण्याचा बेत ठरला आणि लगेच पतंग आणि दोऱा अशी जय्यत तयारी झाली आणि सर्व विद्यार्थ्यासोबत प्राचार्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी पतंग उडवण्याचा आनंद घेत नागपंचमी सण साजरा केला.




परंपरेने साजरा झाला नागपंचमीचा सोहळा

#PKC#POLY#2017#
परंपरेने साजरा झाला नागपंचमीचा सोहळा
फडतरे नॉलेज सिटीच्या पॉलिटेक्निकमध्ये

मुलींनी घेतला पारंपारिक नाच-गाण्याचा आनंद

श्रावणमासातील मराठी सणांची सुरवात नागदेवतेच्या म्हणजेच नागपंचमीने होते. मराठी वर्षात मराठी सणांना श्रावणात खूप महत्व असते. जूनमधील पावसाच्या पहिल्या टप्प्याने शेतकरी वर्ग सुखावलेला असतो त्याची महत्त्वाची शेतीत सध्या सुरु असतात. साप-नाग हे शेतकऱ्यांचे मित्रच आहेत. हा सामाजिक संदेश नागपंचमी हा सण समाजाला देतो. साप-नाग नागांच्या वास्तव्याच्या ठिकाणी जाऊन त्यांची पूजा करून झाडाखाली, शेतावर झाडाला बांधलेल्या झोपाळ्यावर झुलण्याचा आनंद घेत गृहिणी माहेरच्या आठवतीत अनेक गाणी गातात.
याच सणाची आठवण देणारा हा कार्यक्रम नाच-गाण्याच्या संगतीत आज फडतरे नॉलेज सिटी अंतर्गत फडतरे पॉलिटेक्निकच्या मुलींनी मोठ्या उत्साहात साजरा केला. पारंपारिक गाण्यांनी कॅम्पसने आज वेगळे वातावरण अनुभवले.








Saturday, 29 July 2017

#pkc#school#2017
वाढदिनी दिली अनोखी भेट
आपल्याच शाळेला दिली पुस्तकांची देणगी

......................................................................
कु. मैथीली बावकर हिचा आदर्श उपक्रम
.........................................................................
येथील फडतरे नॉलेज सिटी कळंब अंतर्गत श्री व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये अनेक शैक्षणिक उपक्रम. सामाजिक उपक्रम घेतलेे जातात. त्यापैकीच एक उपक्रम कु. मैथिली सत्यवान बावकर इयत्ता 6 वीच्या विद्यार्थीनीने आपला जन्मदिवस आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने साजरा करून एक आदर्श सर्वांसमोर ठेवला. 

मैथीली बावकर हीने आपल्या वाढदिवसादिवशी शाळेच्या ग्रंथालयास वाचनीय पुस्तके भेट देवून एका चांगल्या सामाजिक उपक्रमाचा पायंडा घालून दिला. तिच्या या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष श्री. उत्तम फडतरे तसेच शाळेचे प्राचार्य श्री. संदीप पानसरे यांनी कौतुक केले.
यावेली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य संदीप पानसरे म्हणाले, मुलांनी त्यांच्या वाढदिवसादिवशी अनाहत खर्च करण्यापेक्षा अशाच प्रकारचे सामाजिक उफक्रम तसेच गरजूंना मदत सामाजिक कार्य बालवयापासून करुन जीवनात चांगली नीतिमुल्ये जोपासावीत. त्याचा त्यांना फायदा होईल.
याप्रसंगी ग्रंथपाल सौ. प्रज्ञा अनपट, रज्जाक अत्तार, नितीन सोरटे, समीर पठाण, अनिता भाटीया, निलम डोंबाळे, प्राचार्य सौ. स्मिता जगताप आदी उपस्थित होते.

Tuesday, 25 July 2017

स्वदेशी वस्तू वापरण्याचा नारा

श्री व्यंकटेश्वरा स्कूलच्या विद्यार्थ्यांचा
स्वदेशी वस्तू वापरण्याचा नारा
....................................................................................................
कळंब-वालचंदनगर ता. इंदापूर येथील फडतरे नॉलेज सिटी अंतर्गत श्री व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने चीनी मालाच्या वापराचा निषेध करून स्वदेशीचा वस्तू वापरण्याचा नारा दिला व तशी शपथही घेतली.
जम्मू-काश्मिरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हा उपक्रम घेण्यात आला. 

...............................................................................................................
फडतरे नाॅलेज सिटीतील विद्यार्थ्यांनी घेतली स्वदेशीच वापरण्याची शपथ 
.................................................................................................................

सहशिक्षिका रुपाली शिंदे यांनी स्वतंत्र भारतापुढील आव्हाने व अडथळे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच भारतीय वस्तूच वापराव्यात हे स्पष्ट केले. यावेळी स्कूलचे प्राचार्य मा. संदीप पानसरे यांच्यासह शिक्षक व सहकारी उपस्थित होते.

ज्युनिअर लिडर स्पर्धेत सहभागामुळे
विद्यार्थ्याच्या सामान्यज्ञानात भर

फडतरे नॉलेज सिटी, कळंबच्या 180 विद्यार्थ्यांचा सहभाग

नवीन पिढीत लिडरशीपच्या गुणांचा विकास होण्याच्या दृष्टीने सकाळ पेपर्स लि. आयोजित सकाळ-ज्युनिअर लिडर स्पर्धेत व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडियम स्कूलच्या 180 विद्यार्थ्यानी आपला सहभाग नोंदवला आहे.
या उपक्रमातून विद्यार्थ्याच्या सामान्य ज्ञानात प्रचंड मोठी भर पडत आहे. वृत्तपत्र आणि वाचनाची गोडी वाढावी म्हणून सकाळ माध्यम समूहाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात आमच्या संस्थेतील मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री, उत्तम फडतरे यांनी दिली.

बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या मुलांना मराठी वाचण्याची आवडत नसते परंतु या उपक्रमामुळे ही आवड निर्माण होणार आहे असे मत प्राचार्य संदीप पानसरे यांनी यावेळी व्यक्त केले.


शाळेच्या आवारात 50 झांडांचे वृक्षारोपण


विद्यार्थ्याच्या वाढदिवसानिमित्त
शाळेच्या आवारात 50 झांडांचे वृक्षारोपण

कळंब-वालचंदनगर येथील फडतरे नॉलेज सिटी अंतर्गत फडतरे ग्लोबल स्कूलचा विद्यार्थी प्रथमेश मोरे याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेच्या आवारात 50 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

सतत नवनवीन उपक्रम राबविण्याचा लौकीक असलेल्या परिसरातील एकमेव उपक्रममशील शाळा म्हणून स्कूलच्यावतीने हा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. यावेळी फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे, सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्या ऋतुजा मोरे, जगन्नाथ मोरे, प्राचार्य संदीप पानसरे, प्राचार्य सीमा जगताप, अनिता भाटिया, नीलम डोंबाळे, संजय पाटोळे उपस्थित होते.

व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडियम स्कूलची लघुनाटिका

मी झाड बोलतोय.... 
मधून वृक्षारोपणाबाबत जागृती
व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडियम स्कूलची लघुनाटिका

वालचंदनगर – जन्मापासून, मरेर्यंत मी तुम्हाला मदत करतोय, फळे, फुले देतोय, जगण्यासाठी ऑक्सिजनही देतोय, अरे माणसांनो सरणासाठी सुद्धा माझाच वापर होतोय, किमान एकतरी झाड लावा, असे आर्जव करत कळंब (ता.इंदापूर)  येथील व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडियम स्कूलमधील विद्यार्थ्याकडून वृक्षारोपण जागृती करण्यात आली.
..............................................................................................................
पर्यावरण दिनानिमित्त उपक्रम
..............................................................................................................

फडतरे नॉलेज सिटीअंतर्गत (www.dkkkp.edu.in) व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडियम स्कूलच्या आवारात हा कार्यक्रम घेण्यात आला. वृक्षारोपणाबाबत जनजागृती करण्यासाठी येथील आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी मी झाड बोलतोय ही नाटिका तयार करून तिचे सादरीकरण या कार्यक्रमात केले.
कार्यक्रमात फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे, सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्या ऋतुजा मोरे, जगन्नाथ मोरे, प्राचार्य संदीप पानसरे, प्राचार्य सीमा जगताप, अनिता भाटिया, नीलम डोंबाळे, संजय पाटोळे उपस्थित होते.

फडतरे नाॅलेज सिटीत पालक मेळाव्याचे आयोजन

श्री व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडियम स्कूल व 
फडतरे ग्लोबल स्कूलच्या पालकांचा मेळावा उत्साहात

 कळंब-वालचंदनगर – येथील फडतरे नॉलेज सिटी अंतर्गत श्री व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडियम स्कूल व फडतरे ग्लोबल स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2017-18 मधील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी शाळा प्रशासनातर्फे मेळावा आयोजित करण्यात आला होता. 
या मेळाव्यात संस्थेचे अध्यक्ष मा. उत्तम फडतरे यांनी फडतरे नॉलेज सिटीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी-पालकांचे स्वागत केले. संस्थेच्या शैक्षणिक उपक्रम व सोयी सुविधा व पुढील वाटचालीसंदर्भात मार्गदर्शन केले.

प्राचार्य श्री. संदीप पानसरे यांनी विद्यार्थीकेंद्रीत शैक्षणिक पद्धतीचा वापर करत असतानाच विद्यार्थ्याचा चौफेर विकासासाठी शाळा करत असलेल्या प्रयत्नांचा आढावा पालकांसमोर सादर केला. पुढील नियोजनासंदर्भात पालकांना माहिती दिली. शाळेच्या विविध उपक्रमांत पालकांनी जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्याच्या जडणघडणीत शाळेसोबत पालकांचाही किती मोठा वाटा आहे यासंदर्भात मार्गदर्शन केले.

यावेळी अनेक पालकांनी आपले अनुभव कथन केले. बहुसंख्य संख्येने या मेळाव्यात पालकांनी सहभाग दर्शविल्याबद्दल शाळा प्रशासनाच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.  हा मेळावा यशस्वी पार पाडण्यासाठी प्राचार्य संदीप पानसरे व त्यांच्या सहकाऱ्यांचे प्रयत्न कामी आले.