कळंब येथे विद्यार्थीनींनी झाडांना राख्या बांधून
वृक्षसंवर्धनाचा दिला सामाजिक संदेश
कळंब-वालचंदनगर येथील फडतरे नॉलेज सिटी अंतर्गत व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थीनींनी झाडांना राख्या बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे व सचिव दतात्रय फडतरे यांच्या मार्ग दर्शनाखाली रक्षाबंधनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन येथे करण्यात आले होते.
कळंब येथे व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडियम स्कूलमधील विद्यार्थीनींनी शाळेमध्ये राख्या तयार केल्या व त्या शाळेच्या आवारातील झाडाला बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. यावेळी प्राचार्य संदीप पानसरे म्हणाले, झाडे ही मनुष्याला मोफत ऑक्सिजन, फळे, फुले, सावली देत असतात. प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी झाड लावून वृक्षसंवर्धन मोहिमेत सहभाग घ्यावा, यावेळी कलावंत भिसे, राजेंद्र जाधव, अर्चना रणवरे, अश्विनी रणवरे, चारुशीला जाधव, तृप्ती पालसे, मोनिका गायकवाड उपस्थित होत्या.

No comments:
Post a Comment