श्री व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडियम स्कूल व
फडतरे ग्लोबल स्कूलच्या पालकांचा मेळावा उत्साहात
या मेळाव्यात संस्थेचे अध्यक्ष मा. उत्तम फडतरे यांनी फडतरे नॉलेज सिटीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी-पालकांचे स्वागत केले. संस्थेच्या शैक्षणिक उपक्रम व सोयी सुविधा व पुढील वाटचालीसंदर्भात मार्गदर्शन केले.
प्राचार्य श्री. संदीप पानसरे यांनी विद्यार्थीकेंद्रीत शैक्षणिक पद्धतीचा वापर करत असतानाच विद्यार्थ्याचा चौफेर विकासासाठी शाळा करत असलेल्या प्रयत्नांचा आढावा पालकांसमोर सादर केला. पुढील नियोजनासंदर्भात पालकांना माहिती दिली. शाळेच्या विविध उपक्रमांत पालकांनी जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्याच्या जडणघडणीत शाळेसोबत पालकांचाही किती मोठा वाटा आहे यासंदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी अनेक पालकांनी आपले अनुभव कथन केले. बहुसंख्य संख्येने या मेळाव्यात पालकांनी सहभाग दर्शविल्याबद्दल शाळा प्रशासनाच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले. हा मेळावा यशस्वी पार पाडण्यासाठी प्राचार्य संदीप पानसरे व त्यांच्या सहकाऱ्यांचे प्रयत्न कामी आले.



No comments:
Post a Comment