Saturday, 6 May 2017

फडतरे नॉलेज सिटीमध्ये रंगला कुस्तीचा थरार

फडतरे नॉलेज सिटीमध्ये 
रंगला  कुस्तीचा थरार

ता. 5 मे 2017 रोजी दुपारी 3 वाजता कळंब-वालचंदनगर ता. इंदापूर जि. पुणे येथील फडतरे नॉलेज सिटी या शैक्षणिक संकुलात मॅटवरील आणि लाल मातीच्या कुस्तीचा थरार रंगला. निमित्त होते कै. बाबासाहेब फडतरे-देशमुख यांच्या आठव्या पुण्यतिथीचे.

फडतरे उद्योग समूह व ज्ञान, कला, क्रीडा व कृषि प्रतिष्ठान यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेली 8 वर्षे सातत्याने  कुस्ती मैदानाचा हा उपक्रम राबविला जातो. आजवर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी या मातीत आपली कारकीर्द नोंदविली आहे. आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या खेळाने कळंब-वालचंदनगर
परिसरातील रसिकांची दाद मिळविली आहे.

यावर्षीच्या कुस्ती प्रामुख्याने आंतरराज्य खेळाडूंमध्ये झाल्या.  पै. मल्लसम्राट रावसाहेब मगर, पै. भीमराव माळी, पै. विष्णू गोरेयांच्या अनुभवाखाली या कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष मा. उत्तम दादा फडतरे यांनी या मैदानाचे आयोजन केले होते.  कुस्तीसमालोचक म्हणून ख्यातनाम पै. शंकर पुजारी, पै. प्रशांत भागवत, पै. सुभाष दिवसे यांची रनिंग काॅमेण्ट्री रसिक आणि मल्लांना प्रोत्साहन देत होती.

दु. 3 वाजता या मैदानास सुरवात झाली व रात्री 8 वाजता वरुणराजाच्या स्वागतात या मैदानाची सांगता झाली.
महिलांच्या मॅटवरील कुस्ती हे यावर्षीच्या मैदानाचे आकर्षण होते. पुण्याची यशवी खेडेकर, ठाण्याची अश्विनी मढवी, साताऱ्याची प्राजक्ता चव्हाण, सोलापूरची पूजा चव्हाण, स्नेहल वायदंडे, निकीता मोरे, राधिका चव्हाण, नगरची धनश्री फंडला, जळगावची रुपाली महाजन बीडची प्रतीक्षा मुंडे, सांगलीची किरण अशा महिला कुस्तीपट्टूंचा समावेश होता.


या मैदानादरम्यानच विविध क्षेत्रांत आपल्या विशेष कार्याद्वारे ठसा उमटवणाऱ्या नामवंत हस्तींचा मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. त्यात उत्कृष्ट जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, वैद्यकीय सेवेबद्दल डॉ. राजेंद्र मुथा, अभ्यासू पत्रकारितेबद्दल ज्ञानेश्वर रायते, उत्कृष्ट वक्ते म्हणून औदुंबर बुधावले, आंतराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड, उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक शिवाजी कोळी यांचा समावेश होता.

यावेळी महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर, मल्लसम्राट रावसाहेब मगर, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष संजय मामा शिंदे, भीमराव माळी, महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे, पै. मारुती मारकड, संभाजी पाटील, जालिंदर माने, संयोजक उत्तम फडतरे, दत्तात्रय फडतरे, जय फडतरे, मधुकर पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment