मराठी भाषा दिन ( 27 फेब्रुवारी)
ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनी आपण मराठी भाषा दिन साजरा करतो. एक समृद्ध आणि प्रभावी भाषा म्हणून मराठी भाषेचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे. आपल्या विद्यार्थ्यांना कुसुमाग्रजांच्या नाट्य आणि साहित्य संस्कृतीचा लाभ व्हावा आणि विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कक्षा रुंदाव्यात यासाठी फडतरे नॉलेज सिटीमध्ये दरवर्षी मराठी भाषा दिन साजरा केला जातो.
विद्यार्थ्यांना मराठी भाषेविषयी आवड निर्माण व्हावी, मातृभाषेबद्दल प्रेम आणि ज्वाजल्य निर्माण होवून प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात राष्ट्रभक्ती जागृत करण्याचे काम फडतरे नॉलेज सिटीकडून केले जाते. - फडतरे नॉलेज सिटी, कळंब-वालचंदनगर यांच्यावतीने प्रसारित (स्त्रोत-इंटरनेट)

No comments:
Post a Comment