Saturday, 6 May 2017

फडतरे नॉलेज सिटीतील रक्तदान
शिबिरात 153 जणांचे रक्तदान

 कै. बाबासाहेब साहेबराव फडतरे यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त फडतरे नॉलेज सिटी, कळंब-वालचंदनगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे 153 जणांनी रक्तदान करुन समाजपयोगी कार्यात आपला मोलाचा वाटा उचलला. प्रत्येक वर्षी फडतरे नॉलेज सिटीतर्फे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.  
फडतरे उद्योग समूह व संजीवनी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता काशिनाथ देवकाते, इंदापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल ननावरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थापक उत्तम फडतरे, महेश निंबाळकर, जय फडतरे, डॉ. विनोद, आयटीआयचे प्राचार्य अनिल तांबे, संदीप पानसरे, गणेश चव्हाण, पिंटू डोंबाळे, अमोल चव्हाण यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment