Friday, 28 April 2017

फडतरे नाॅलेज सिटी...निवासी शाळा

फडतरे नाॅलेज सिटी अंतर्गत
श्री व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडियम स्कूल
निवासी शाळा प्रवेश सुरु

बदलत्या नैसर्गिक परिस्थितीमुळे तसेच बदलत्या कौटुंबिक गरजांमुळे आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक तसेच व्यक्तिमत्व विकासाकडे पालकांना 24 तास लक्ष देणे आताशा खूप अवघड झाले आहे. एकीकडे शहरात ही परिस्थिती वाढत असताना, ग्रामीण भागातही शेती आणि उद्याेगांच्या बदललेल्या धोरणांमुळे आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होवू लागले आहे. त्यातूनच निवासी शाळांची मागणी वाढत आहे. पण अशा शाळांना आपली मुलं सुपूर्द करण्याअगोदर त्या कॅम्पसला निश्चित भेट द्यावी. जेवण-राहणे या तर मुख्य गोष्टी असल्या तरीही आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास करणारा कॅम्पस, प्रिन्सिपल आणि स्टाफ असल्याची खात्री करा.

 कळंब-वालचंदनगर हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून औद्योगिक शहर म्हणून ओळखं असलेले ठिकाण आहे.
पुणे जिल्हयातील इंदापूर तालुक्यात कळंब हे गाव आहे. कळंब-वालचंदनगर ही एकमेकांशेजारी असलेली गावे आहेत. पुण्यापासून 120 किलोमीटर अंतरावर फडतरे नाॅलेज सिटी हा कॅम्पस वसलेला आहे.
फडतरे ग्रुप आणि ज्ञान, कला, क्रिडा व कृषी प्रतिष्ठानच्या अंतर्गत या शैक्षणिक संकुलात नर्सरी पासून 9 वीपर्यंत सध्या शिक्षणाची सोय आहे. तसेच आयटीआय, ज्युनिअऱ काॅलेज (सायन्स), आय.टी.आय., पाॅलिटेक्निक आणि एम.बी.ए. काॅलेजची सुद्धा सोय आहे.

एक शैक्षणिक संकूल म्हणून ज्या गरजा असतात त्या सर्व विद्यार्थीकेंद्रीत गरजा आपल्याला इथे मिळतात. उदा. लायब्ररी, लॅब, हवेशीर क्लासरुम्स, संगणक लॅब, बस सेवा, हाॅस्टेल व कॅण्टीन सुविधा आदी.



आपल्या पाल्यासाठी श्री व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडियम स्कूल निवासी शाळा हा उत्तम पर्याय ठरतो.  इथे
 एस.एस.सी आणि सीबीएसई या दोन्ही पॅटर्नमध्ये शिक्षण घेण्याची सोय आहे. टाटा डिजिटल क्लासरुम, अबॅकस, लॅग्वेज लॅब, मॅथ्स लॅब तसेच यावर्षापासून परदेशी भाषा शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अभ्यासासोबतच मॅटवरील कुस्ती प्रशिक्षण, कराटे, घोडेसवारी, एरोबिक्स, मल्लखांब, हॅण्डबाॅल, व्हाॅलिबाॅल, टेनिस, स्केटिंग अशा खेळांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते.  विविध शालेय स्पर्धांचे आयोजनही कॅम्पसमध्ये होते. दरवर्षी 5 मे रोजी जंगी कुस्त्यांचे मैदान फडतरे नाॅलेज सिटीच्या कॅम्पसमध्ये हजारो कुस्ती शौकींनाच्या आणि मैदान गाजवलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडते.


विविध उपक्रमांसोबत विद्यार्थ्यांचा विकास हेच ध्येय धोरण समोर ठेवून संस्थाचालक, प्राचार्य आणि स्टाफ कार्यरत असतो. एकदा अनुभव घेण्यासाठी तुम्ही या कॅम्पसला जरुर भेट द्या.  आणि खात्री पटल्यानंतर आपल्या पाल्याचं अॅडमिशन अगदी बिनधास्त इथे करा.





No comments:

Post a Comment