Sunday, 23 April 2017

फडतरे नाॅलेज सिटीमध्ये 
2017-18 शैक्षणिक वर्षासाठी 
प्रवेश प्रक्रिया सुरू!!!!

सोशल मिडियाचा प्रभावी वापर

कळंब-वालचंदनगर येथील फडतरे नाॅलेज सिटी म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विद्यापीठच झाले आहे. टाटा स्काय क्लासरुम, अद्ययावत इआरपी सिस्टीम, एसएमएस अपडेटस भव्य कॅम्पस यामुळे अद्यायावत असलेल्या या कॅम्पसने यावर्षी सोशल मिडियाचा प्रभावी वापर करण्याचे ठरविले व त्यावर कामकाजही सुरु केले.

विद्यार्थी-शाळा-काॅलेज-पालक-शिक्षक यांच्यातील सुसंवाद वाढावा व विद्यार्थीकेंद्रीत अभ्यासक्रमाची आखणी करताना आणखी मदत व्हावी यासाठी हा सोशल मिडिया फ्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे.
शाळा-काॅलेज मध्ये होणाऱ्या प्रत्येक उपक्रमाची माहिती  पालक आणि विद्यार्थी यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांच्या हातात मिळणार आहे.

आजवर या कॅम्पसमधून बाहेर पडलेले सर्व विद्यार्थी यानिमित्ताने जोडले गेले आहेत. पुन्हा एकदा त्यांना फडतरे नाॅलज सिटीच्या सोशल मिडिया फ्लॅटफॉर्मवर आणून त्यांचेही अनुभव आताच्या विद्यार्थ्यांना देण्याचे काम यानिमित्ताने होणार आहे.

केजी टू पीजी अशी या कॅम्पसची ओळख आहे.  नर्सरी पासून माध्यमिक शिक्षण देत असताना त्यात स्टेट बोर्ड आणि सीबीएसई असे दोन्ही पॅटर्न येथे यशस्वीरित्या कार्यरत आहेत. त्यास पालक-विद्यार्थ्यांचाही मोठा प्रतिसाद आहे.

दहावी पास-नापास विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक दालन खुलं राहावे यासाठी आयटीआय सुद्दा या कॅम्पसमध्ये आहे. इंडस्ट्रियल ट्रेनिग इन्स्टीट्यूटचं खरं वैशिष्ट म्हणजे इथं 100 % नोकरीची हमी देणारा कोर्स आहे.
इथल्या प्रत्येक विद्यार्थ्यास नोकरीची संधी आयटीआयच्या माध्यमातून देता आली आहे.

उपक्रमशील शाळा असा गौरव करता येईल अशी ख्याती या कॅम्पसमधील व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडियम स्कूल आणि फडतरे ग्लोबल स्कूल अशा दोन्ही शाळांची आहे. अभ्यासासोबतच विद्यार्थ्याचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी अनेक उपक्रमांचे आयोजन, स्पर्धा सहभाग राबविले जातात. लहानवयात खेळाला अनन्यसाधारण महत्व् म्हणूनच जवळपास सर्व खेळांचे साहित्य शाळेमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. घोडेसवारी, बुद्धीबळ, कुस्ती, स्केटींग, म्युझिक बॅण्ड, मनोरंजनासाठी विविध खेळणी अशी पर्वणी बालचमूला मिळते. हा कॅम्पस मुलांना आवडेल असाच आहे. पालकांनी या शाळेत प्रवेश घ्यावा आणि त्याच्या भविष्याची चिंता सोडावी, अशी ग्वाही आमचे प्रिन्सिपल देतात.
.............................................................................................
अधिक माहितीसाठी भेट द्या  http://www.dkkkp.edu.in/
.............................................................................................

2010 साली परिसरातील युवकांची गरज ओळखून बाबासाहेब फडतरे पाॅलिटेक्निकची स्थापना करण्यात आली. मॅकेनिकल , आॅटोमोबाईल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्राॅनिक्स व टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग अशा पाच शाखांचे शिक्षण इथे दिले जाते. अनुभवी प्राचार्य व स्टाफ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्याचे भविष्य घडविण्यात मदत करण्याचे काम इथे केले जाते.
करिअरमधील अडचणी, करिअर मार्गदर्शन, सेमिनार्स, वर्कशाॅप्स अशा अनेक उपक्रमांतून विद्यार्थीभिमुख इन्स्टिट्यूट अशी ओळख बाबासाहेब फडतरे पाॅलिटेक्निकची झाली आहे.
कॅम्पस इंटरव्हू च्या माध्यमातून अनेक मोठ-मोठ्या कंपन्यामध्ये या काॅलेजच्या विद्यार्थ्याची निवड झाली आहे व ते यशस्वीपणे आपली जबाबदारी पार पाडत आहे.

No comments:

Post a Comment